करिअर/सोशल मीडियाकवितासाप्ताहिक सदर

काळोखाच्या कविता लिहिणारा जगप्रसिद्ध कवी लाॅर्ड बायरन

प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, रत्नागीरी

जगात काळोख ही प्रतिमा घेऊन काव्यलेखन करणा-या कवींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मराठी दलित कवितेचा खुप मोठा भाग काळोख, अंधार या प्रतिमेने‌ व्यापलेला आहे .सुरवातीला या कवितेतील दुरूखाने सर्वांना अस्वस्थ केले. नंतर सारखी सारखी एखादी प्रतिमा वापरली की तिचे नाविण्य नाहीसे होते.सुरवातीला ज्याने कोणी ती वापरली असेल तेंव्हा तिच्यात नाविण्य असते नंतर मात्र केवळ गुळगुळीतपणा येतो. दलित कवितेवर असाच आक्षेप तोच तोचपणाचा घेण्यात आला. काळोखाच्या नावाच्या शिर्षकासारखी अनेक पुस्तके मराठीत येऊन गेली आहेत. ऋत्विक काळसेकर यांचा ‘काळोखाच्या तळाशी’ हा संग्रह मी वाचला. माणसाला अस्वस्थ करणारा दर्जेदार संग्रह आहे. ते आज आपणात नाहीत. लोकवाड्मयगृहने तो प्रसिद्ध केला आहे. काळोख ही प्रतिमा तशी निराशेचे सूचन करणारी आहे. कुणीतरी एक प्रवाह निर्माण करतो आणि त्यांचे बाकी अनुनय करतात असे मराठी साहित्यात भरपुर झाले आहे. मग ती त्या संप्रदायाची किंवा प्रवाहाची कविता होऊन जाते. काळोखाच्या कविता नंतरच्या कवींनी पहिल्या कवींचा अनुनय केला. त्यांना स्वतंत्र अशा प्रतिमा सुचल्या नाहीत यांच्याकडे तेव्हढी प्रतिभा नव्हतीच. अगदी संग्रहाचे नाव ही दुस-याच्या अनुकरणाने लिहिणारे खुप आहेत. साहजिकच अशी कविता दखलपात्र ठरत नाही. गाजली तरी गाजवलेली असते. जागतिक स्तरावरही अशी कविता आली. मराठीत तर तिचे खुप मोठे पिक आहे. जगात

Pablo Neruda, “Nothing But Death”

Karinna Alves Gulias, “Forgetfulness”

Dunya Mikhail, “Bag of Bones”

Reginald Dwayne Betts, “For the City That Nearly Broke Me”

Louise Glück, “The Myth of Innocence”

Sara Teasdale, “If Death is Kind”

Babeba Baderoon, “Old Photographs”

Sarya Abra, “Test”

lord of darkness-swaney,..

ही त्याची उदाहरणे आहेत.

‘काळोखाच्या कविता’ (Darkness poem published by poerty foundation हा कविता संग्रह जगप्रसिद्ध कवी लाॅर्ड बायरन यांनी जुलै १८१६ मध्ये प्रसिद्ध केला आहे. तो त्याने अशा वर्षात लिहीला ज्या वर्षात उन्हाळा नव्हता. तंबोराचा डोंगर तेंव्हा हळूहळू डच वेस्ट डंडिजमध्ये नष्ट झाला. त्याच्या आधीच्या वर्षी वातावरणात खुप सल्फरडाय आॅक्साईड वाढलेला होता. जागतिक तापमान वाढलेले होते. प्रदुषित झाले होते. दक्षिण उत्तर अमेरिका आणि युरोप यामध्ये वातावरण खुप बदललेले होते. या सगळ्या वातावरणाने बायरनला आपल्या कविता लिहीण्याची प्रेरणा मिळाली. ज्या कवितेची समीक्षा जगातील लोकांनी “लास्टमन पोयेम” अशी केली.”she walks in  beauty” prometheus ,solitude,farewell if ever fondest prayer ह्या अशा अनेक त्यांच्या प्रसिद्ध कविता आहेत. जगातल्या अनेकांनी तिची समीक्षा केली आहे. विनाशाकडे जाणा-या जगाचा आलेख कवीने रेखाटला. जी पृथ्वीवरील शेवटच्या माणसाची कहाणी होती. बर्याच जनांनी यातील ऐतिहासिक आशय, बदलणा-या वातावणाचा मानवावर होणारा परिणाम यावर भाष्य केले. बायरनच्या विवाहानंतर एका महिन्याने त्याने ही कविता लिहीली. त्याच्या बायकोचे नाव “अॅने इसाबेला मिलबंके” होते.त्याचे मुळ नाव जाॅर्ज गार्डन असे आहे (GEORGE GORDON) Darkness  ही त्याची कविता पाहता येते. आणि त्यातील आशयसुत्रे कोणती होती ते ही पाहता येते. कवीने असे एक स्वप्न पाहिले आहे जे जगात कोणीच पाहिले नाही. खरे तर ते अजुन स्वप्नही नाही. असे वाटते आहे की, तारे आणि सुर्य अजुन आहेत. ते मात्र काळोखाच्या पार्श्वभुमीवर. सुर्य आपल्या किरणांशिवाय आहे. ता-यांना अजुन आपला रस्ता माहित नाही. बर्फ पसरलेली पृथ्वी आंधळी आहे. हवा चंद्राशिवाय आहे. सकाळ येते आणि जाते. दिवस जसा असतं नाही. माणूस आपला उत्साह विसरून गेला आहे. सारे विश्व निस्तेज झाले आहे. माणसाने आपणाला नष्ट करण्याची प्रक्रिया त्याने स्वतःहुनच सुरु केली आहे. सगळ्या माणसांच्या प्रार्थना स्वार्थाच्या प्रदेशात बुडून गेलेल्या आहेत. त्या प्रकाशाच्या मार्गावर आहेत. सगळा बदल झाला आहे. राजे भिकारी झाले आहेत. ज्यांच्या सवयी आहेत. ते आपल्या सवयींमध्ये जळून खाक झालेले आहेत. शहरे गोठली गेली आहेत. आणि माणसांचे जथे घरात जमा झाले आहेत. ते केवळ एकमेकांचे चेहरे पाहत आहेत. आपल्या डोळ्यातील अश्रू संपल्यामुळे लोक कंगाल झाले आहेत. दिवे डोंगरांचे विझुन गेले आहेत. जंगले आगीच्या स्थानी आहेत. आशेला सतत भिती वाटते आहे. झाडे तोडली जात आहेत. आणि ट्रकमध्ये भरली जात आहेत. सगळे काळे आणि निस्तेज झाले आहे. माणसांच्या पायातील त्राण जाऊन ते डगमगू लागले आहेत. त्यांच्यावर थोडाच प्रकाश पडतो आहे. आकाश निस्तेज आहे. आहे ते सगळे अंधाराचे साम्राज्य जगाचा भुतकाळ हा धुळीत जाऊन मिळाला आहे. पापाचा नायनाट कसा व्हायचा हा कवीचा प्रश्न आहे. जगण्यासाठी मोठा संघर्ष सुरू झाला आहे. हे एक युद्ध आहे. जे चालूच आहे. काळ हा काहीच राहिलेला नाही. बदल बदल आणि सतत बदल. पृथ्वी हा एक भुतकाळाचा विचार होता. ती आता मेली असा विचार करूया. माणसावर नको ते हाबी झाले आहे. माणसे मेली आहेत आणि त्यांची हाडे विखुरली आहेत. ती आपणाला छोटे छोटे करत चालली आहेत. कुत्रे सुद्धा म्हणायला लागलेत मालक हो. आपण सगळे आता गुलाम आहोत. सगळे पशु प्राणि एका पातळीवर आले आहेत. त्यांच्यावर भूक सवार झाली आहे. मृत्यूची छाया सर्वत्र पसरली आहे. खाण्यासाठी अन्न नाही. शेवटी राहिला आहे तो आतुन येणारा आकांत.ज्याचे उत्तर कोणाजवळही नाही. प्रत्येक जन आपणाला जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. शत्रू हा दिसत नाही पण तो भेटतो आहे. मरणारे ढिगाणे मरत आहेत त्यांचे ढिगारे साचत आहेत. माणसांचा उपयोग पवित्र म्हणून काहीच नाही. ते स्क्रॅप सारखे भंगारात आहेत. त्याची हाडे त्यांचा श्वास शेवटच्या आयुष्याचे दान मागत आहेत. त्यातून एखादी ज्योत तयार व्हावी. डोळ्यातून प्रकाश तेवावा. त्यांनी फक्त इतरांना सहानुभूतीच्या डोळ्यांनी पाहिले. त्यात आत लपवलेले श्वासही मृत झाले. जगच दुर्लेक्षित झाले. सागरविरहित, चंद्रविरहित, सुर्यविरहित, झाडेविरहीत, मनुष्यविरहीत, जीवनविरहित जिथे फक्त मृत्यू राहीला. माणसांचा चिखल झाला. नद्या तळी समुद्र अजुनही उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या खोल खोल आत काहीच नाही. जहाजे नुसती उभी आहेत. शांतताच शांतता आहे. ती नुसती झोपली आहेत. लाटा मृत झालेल्या आहेत. चंद्र आऊटडेटेल झाला असल्यामुळे. वारा अजुन कुठे आहे. तो हवेला मजबुत करायचा. ढग विखुरले गेले आहेत अंधाराला आता कोणाच्याही मदतीची गरज नाही. ते एक विश्व होते जे भुतकाळात जमा झाले. तत्कालिन वातावरणाचा प्रभावी अंश ही कविता पकडते.

त्याच्या एका कवितेचे शिर्षक डार्कनेस आहे. ती खुप प्रभावी कविता आहे. जी आजच्या काळात सुद्धा प्रभावी आहे.I had a dream, which was not all a dream.

The bright sun was extinguish’d, and the stars

Did wander darkling in the eternal space,

Rayless, and pathless, and the icy earth

Swung blind and blackening in the moonless air;

Morn came and went—and came, and brought no day,

And men forgot their passions in the dread

Of this their desolation; and all hearts

Were chill’d into a selfish prayer for light:

And they did live by watchfires—and the thrones,

The palaces of crowned kings—the huts,

The habitations of all things which dwell,

Were burnt for beacons; cities were consum’d,

And men were gather’d round their blazing homes

To look once more into each other’s face;

Happy were those who dwelt within the eye

Of the volcanos, and their mountain-torch:

A fearful hope was all the world contain’d;

Forests were set on fire—but hour by hour

They fell and faded—and the crackling trunks

Extinguish’d with a crash—and all was black.

The brows of men by the despairing light

Wore an unearthly aspect, as by fits

The flashes fell upon them; some lay down

And hid their eyes and wept; and some did rest

Their chins upon their clenched hands, and smil’d;

And others hurried to and fro, and fed

Their funeral piles with fuel, and look’d up

With mad disquietude on the dull sky,

The pall of a past world; and then again

With curses cast them down upon the dust,

And gnash’d their teeth and howl’d: the wild birds shriek’d

And, terrified, did flutter on the ground,

And flap their useless wings; the wildest brutes

Came tame and tremulous; and vipers crawl’d

And twin’d themselves among the multitude,

Hissing, but stingless—they were slain for food.

And War, which for a moment was no more,

Did glut himself again: a meal was bought

With blood, and each sate sullenly apart

Gorging himself in gloom: no love was left;

All earth was but one thought—and that was death

Immediate and inglorious; and the pang

Of famine fed upon all entrails—men

Died, and their bones were tombless as their flesh;

The meagre by the meagre were devour’d,

Even dogs assail’d their masters, all save one,

And he was faithful to a corse, and kept

The birds and beasts and famish’d men at bay,

Till hunger clung them, or the dropping dead

Lur’d their lank jaws; himself sought out no food,

But with a piteous and perpetual moan,

And a quick desolate cry, licking the hand

Which answer’d not with a caress—he died.

The crowd was famish’d by degrees; but two

Of an enormous city did survive,

And they were enemies: they met beside

The dying embers of an altar-place

Where had been heap’d a mass of holy things

For an unholy usage; they rak’d up,

And shivering scrap’d with their cold skeleton hands

The feeble ashes, and their feeble breath

Blew for a little life, and made a flame

Which was a mockery; then they lifted up

Their eyes as it grew lighter, and beheld

Each other’s aspects—saw, and shriek’d, and died—

Even of their mutual hideousness they died,

Unknowing who he was upon whose brow

Famine had written Fiend. The world was void,

The populous and the powerful was a lump,

Seasonless, herbless, treeless, manless, lifeless—

A lump of death—a chaos of hard clay.

The rivers, lakes and ocean all stood still,

And nothing stirr’d within their silent depths;

Ships sailorless lay rotting on the sea,

And their masts fell down piecemeal: as they dropp’d

They slept on the abyss without a surge—

The waves were dead; the tides were in their grave,

The moon, their mistress, had expir’d before;

The winds were wither’d in the stagnant air,

And the clouds perish’d; Darkness had no need

Of aid from them—She was the Universe.

संपुर्ण विश्वाचे एक स्थितीशिल चित्र या कवितेतून तो करतो आहे. नष्ट होत चाललेल्या विश्वाचे शेवटचे श्वास कसे आहेत ते कवी सांगतो आहे.शेवटी सगळे नष्ट होणारे आहे व माणसांचे अस्तित्व क्षणभंगुर आहे. विश्वातील शाश्वत पंचतत्वेही क्षणभंगुर आहेत आणि शाश्वत आहे तो अंधार. विश्वाचे आकलन वैश्विक अनेक पातळ्यांवर करणारी मानवी संबधांचा अन्वयार्थ लावणारी ही जागतिक स्तरावरील श्रेष्ठ कविता आहे. मानवी विषमतेचे आकलन ती करते.सरंजामी व्यवस्थेला आपल्या कवेत घेऊ पाहते.मालक मजुर या संबंधांचा वैश्विक अर्थ लावण्याचा प्रयत्न करते. बायरनची एकच कविता अनेक संग्रहांना पुरून उरणारी आहे हे निश्चित.

 

प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, रत्नागीरी

मो. 9921846198

लेखक साहित्याचे अभ्यासक असून रत्नागीरी ता. गुहागर येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आहेत.

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close