करिअर/सोशल मीडियासाप्ताहिक सदर

ढासळत्या मूल्याचे शेअर्स (शेअर बाजार मराठीतुन)

चला शेअर बाजार समजून घेऊ - भाग अकरा (साप्ताहिक सदर) - विशाल कुलकर्णी, ठाणे

ढासळत्या मूल्याचे शेअर्स

शेअर बाजार Share Market मराठीतुन

वाचकहो, गुंतवणूक शेअर्समधील असोत किंवा म्युच्युअल फंड्स मधील किंवा तत्सम गुंतवणुकीच्या साधनांमधील असो, त्यात जोखीम नावाचा घटक हा आलाच. प्रत्येक गुंतवणूकदाराने ते किती जोखीम घेऊ शकतात हा विचार करणे आवश्यक ठरते. क़ारण त्यांनी केलेल्या गुंतवणूकीवर ह्या गोष्टीचा परिणाम होतो. गुंतवणूकदारांनी त्यांचे उत्पन्न, खर्च, त्यांचा मेळ अश्या महत्वाच्या बाबी ध्यानात ठेवून आपण किती जोखीम घेऊ शकतो हे समजून घेतले पाहिजे. share market news

प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात असा एक प्रश्न निर्माण होतो की शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे जोखीम तर आलीच पण गुंतवणुकीचा नीट अभ्यास करून आणि विकत घेण्याचा विचार असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची व्यवस्थित पडताळणी करून जरी शेअर्स विकत घेतले तरी देखील शेअर्सचे मूल्य खाली का पडते… शेअर्स खाली का पडतात. आपण अगदी काटेकोरपणे आणि चिकित्सकपणे शेअर्स मध्ये गुंतवणूक केली पण शेअर्स खाली पडले मग आता काय करू असा प्रश्न काही गुंतवणूकदारांच्या मनात येतो. तेव्हा शेअर्स विकण्याचा निर्णय हा सारासार विचार करून घेणे गरजेचे आहे. आपण जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे जेव्हा आपण शेअर्स विकत घेतले तेव्हा ती कंपनी उत्तम कामगिरी करून नफा कमावत असेल आणि तिचा ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात दबदबा असेल तर तिच्या शेअर्स चे मूल्य देखील उत्तम परतावा मिळवून देऊ शकते. share market news

अश्या कंपनीचे शेअर्स जेव्हा खाली पडतात तेव्हा लगेचच असे शेअर्स विकायचा विचार करण्यापेक्षा ते शेअर्स खाली का पडले ह्याचा विचार अगोदर करणे आवश्यक आहे. जेव्हा बाजारात मंदी चा शिरकाव होऊ लागतो तेव्हा बाजारात अस्वस्थता निर्माण होऊ लागते. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी असल्याने अनेक व्यवहार थंडावतात आणि त्याचा परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवर पडू लागतो, रोजगारावर देखील काही अंशी परिणाम जाणवू लागतो. बाजारात मंदी आल्याने अनेक उत्तम कंपन्यांचे शेअर्सचे मुल्य खाली जाऊ लागते. कारण अर्थव्यवस्थेतील मंदी, रोजगाराच्या कमी संधी आणि त्यामुळे ग्राहकांची खालावलेली खरेदीची क्षमता ज्यामुळे अनेक ग्राहकोपयोगी उत्पादनाच्या विक्रीत घट होऊ लागते. त्याचा प्रतिकूल परिणाम कंपन्यांच्या कामगिरीवर होतो व बाजारातील त्यांचे मुल्य कमी होऊ लागते. पण समजा जर कंपनीची कामगिरी दिवसेंदिवस ढासळत चालली असेल तर अश्या कंपनीचे शेअर्स आपल्याकडे आपल्याला काही फायदा होणार आहे का ह्याचा विचार करणे गरजेचे आहे. share market news

हे ही वाचा – कर्ज आणि त्याची परतफेड : भाग १

हे ही वाचा – कर्ज आणि त्याची परतफेड : भाग २

हे ही वाचा – Diversified Investment म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? 

हे ही वाचा – स्थिर परताव्याची गुंतवणूक म्हणजे काय? 

हे ही वाचा – शेअर बाजारातील “टार्गेट” (Stock market targets) 

हे ही वाचा – गुंतवणूक करतांना निरीक्षण आणि निर्णय महत्वाचे

हे ही वाचा – निर्णयांचा परिणाम 

विशाल कुलकर्णी
एम.बी.ए. फायनान्स
(ठाणे) संपर्क :- ९१३६३०५१७६
ईमेल – kulkarnivishal05@gmail.com
शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close