बातमीपत्र

लोकसंवाद || निर्भेळ… – सौ. वर्षा दौंड

लोकसंवाद

लोकसंवाद

मराठी साहित्य वार्ताच्या वतीने काल दि. 29 मार्च रोजी ‘‘गजल रंगोत्सव’’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यापैकी एक प्रेक्षक असलेल्या वर्षा दौंड यांची या कार्यक्रमासंदर्भातील प्रतिक्रिया आम्ही आज येथे प्रसिद्ध करीत आहोत.

लोकसंवाद : मराठी साहित्य वार्ता आयोजीत धुलीवंदन निमित्त “गझल रंगोत्सव” कार्यक्रम काल यूट्यूब चॅनलवर ऐकला. खरेतर हा कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता “लाईव्ह शो “होता. पण काही कारणास्तव ऐकू शकले नाही, म्हणून रात्री उशिरा युट्युब वर ऐकला. प्रथम तर “मराठी साहित्य वार्ता” च्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद ! त्यांनी मीडियावर अनेक कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने राबवलेल्या “कवी संमेलनाच्या” वेळी मी या ग्रुपचे सभासद झाले आणि मला साहित्य वार्ताच्या विविध कार्यक्रमात सहभागी व्हायची आणि हजेरी लावायची पर्वणी मिळाली. खूप धन्यवाद! कालचा रंगोत्सव गझलांचा कार्यक्रम खूपच छान होता. प्राजक्ता पटवर्धन (पुणे) यांनी गोड आवाजात सूत्रसंचालन सुंदर रीतीने केले. त्यांच्या स्वतःच्या दोन गझल व तरन्नुम सुंदरच! ठाण्याच्या “जनार्दन केशव” यांच्यासुद्धा गझल ऐकण्याचे भाग्य लाभले! दुसऱ्या राउंड मधील त्यांची गझल खुपच आवडली.

“लिहिन काही आता म्हणतो…
तुझ्या रेशमी हातांवर…
नवी छानशी कविता करतो…
तुझ्या रेशमी हातावर!
कणिक मळते त्यातही…
नवी एक नजाकत आढळते…
पोळीचा आस्वाद उतरतो…
तुझ्या रेशमी हातांवर…
प्रत्येकीला मिळते कुठे…
तुला लाभली जादू जी…
मोदक सुद्धा लयीत घुमतो…
तुझ्या रेशमी हातावर!

लोकसंवाद || निर्भेळ… – सौ. वर्षा दौंड

वा!!! सुंदरच!!! सुनीती लिमये व मानसी चाफेकर यांचे सुंदर शेर कान तृप्त करून गेलेत. सुनीतिताईंची तरन्नुम लाजबाब! आणि गाथा ! काय बोलू तुला? किती अचूक नाव ठेवले ग तुझे! आईवडिलांनी. तू तुझ्या शेरांमध्ये म्हणतेस “तुकोबाची गाथा… तू”! वाव!! पाळण्यातच पाय दिसले असावे तुझे आई-वडिलांना… म्हणूनच एवढे सुंदर नाव ठेवले तुझे! किती मधुर आवाज… आर्तता जाणवली! आणि गझल किती सुंदर तुझी..!

“…शेर जरी सान
माझा अर्थ बघ बलवान माझा!
घाव अजूनी खोल दे ना…
राख थोडा मान माझा….
जन्मत: मृत्यूस केला…
जन्म मी तर… दान माझा..!
खेळताना वेदनांशी.… वेदनांशी… खेळताना..
जीव रमतो… छान माझा !!!
तू कसा निश्चिंत इतका?…
श्वास जर बेभान.. माझा!
जीर्ण जाळीदार व्हावा…
जन्म पिंपळपान माझा!!!
शोधणे… माणुसकीला…
छंद हा ..नादान माझा !
मी तुझी “गाथा” तुकोबा !!
…हाच तर… सन्मान माझा!!

वाव!! अप्रतिम !!!!किती सुंदर! आणि तुझी पेशकश त्याहुनही सुंदर! आणि लास्ट बट नॉट लिस्ट… अध्यक्षांचे अध्यक्षीय भाषण! आणि त्यांची गजल! डॉ. कैलास गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष… यांची गझल मनाला खूप भावली!”

“जिंकणे प्रत्येक वेळी… शक्य नाही…!
ती… तशी… हमखास खेळी शक्य नाही…!
भाव त्या डोळ्यातले पाहून घेतो…
भाव त्या डोळ्यातले पाहून घेतो…
वाचणे प्रत्येक वेळी… शक्य नाही!!!

वा! वा! कैलास दादा, आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणतात की, साहित्य वार्ताने मराठीच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसाराला संधी दिली त्याबद्दल खूप आभार!! आणि आजची आपली जी पिढी आहे ती वाचनापासून दूर चाललेली आहे फक्त इ-बुक्स किंवा किंडल वगैरेवर ते वाचतात तर त्यांना ही चांगली संधी आहे की जे आपल्याला साहित्य वार्ताने व्यासपीठ दिले आहे. मुशायरा घेणे… हीसुद्धा एक आनंदाची बाब आहे असेही ते म्हटले! आणि गझलेचा हा दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याबद्दल संधी दिली त्यासाठी त्यांनी मराठी साहित्य वार्ताच्या टीमचे आभार मानले. एकंदरच खूप सुंदर कार्यक्रम. श्रोत्यांच्या तर्फे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.

सौ. वर्षा दौंड, पुणे

संपर्क – ९७५७४३०६८५

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close