बातमीपत्रलोकसंवादसाप्ताहिक सदर

वृध्द महिला स्वातंत्र्य सैनिक आबदी बानो बेगम (बी. अम्मा)

"भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मुस्लीम क्रांतीनायकांचे योगदान" || साप्ताहिक सदर (भाग १७) - अताउल्लाखाँ रफिकखाँ पठाण

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मुस्लीम क्रांतीनायकांचे योगदान
Contribution of Muslim Revolutionaries in the Indian War of Independence

???? देशभक्त लढवैय्ये मौलाना मोहंमद अली जोहर आणि मौलाना शौकत अली (अली बंधू) ची आई.
???? ऑल इंडिया महिला कॉन्फरन्स १९२१ अहमदाबादच्या अध्यक्षा.
???? हिंदु -मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते नेहमी म्हणत हिंदु-मुस्लिम ऐक्या शिवाय स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे

???? एका भाषणामुळे व्हॉयसरायने अटक वॉरंट जारी केले होते पण अटकेनंतर काय परिस्थिती उद्भवेल यावर विचार करून आदेश परत घेतला, त्यावेळेला बी. अम्मांचे वय ७२ वर्षे होते.
???? गांधीजी, बी. अम्मांना एकता, स्वातंत्र्य भारताचे निशान म्हणत असत आणि ते स्वतः बी. अम्मांचा मी तिसरा मुलगा आहे असे मानत.

बी. अम्माचा जन्म १८५२ मध्ये अमरोहा (मुरादाबाद) येथे झाला. त्यांचे लग्न रामपूर स्टेटचे अब्दुल अली खान यांच्याशी झाले. त्यांच्या पतीचे तरुनपणातच निधन झालं. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात तेव्हा झाली, जेव्हा अली बंधुंना इंग्रज सरकारने अटक करून जेलमध्ये टाकले. ६ ऑगष्ट १९१७ ला सुब्रमण्यम अय्यरला त्यांनी पत्र लिहले. की, “हि इज्जत (कैद) त्या लोकांसाठी आहे ज्यांना अल्लाहने आपल्या धर्म आणि देशासाठी त्रास, हाल सोसायची ताकत दिली. अली बंधू कित्येक वर्षे सक्त कैदेत त्रास सोसत होते. तेव्हा सर चार्लस यांनी एका पत्राद्वारे बी. अम्माना म्हणाले होते, आपल्या दोन्ही मुलांना मो. अली जोहर आणि मौलाना शौकत अलीला आम्ही जेलमधून सोडून देऊ पण आमची ही अट आहे की, दोन्ही बंधू भाऊ इंग्रज सरकारच्या विरुध्द भाषण करणार नाहीत आणि वृत्तपत्रात आमच्या विरुध्द लिहिणार नाहीत.

बी. अम्मांनी या पत्राला वृत्तपत्रात प्रकाशित केले आणि लिहिले मी, खुप वृध्द आहे पण माझी मुले खुप समजदार आहेत. त्यांना सल्ला देण्याची गरज नाही. पण मुलांनी ऐकावे आणि आपल्या अश्या लेखी उत्तराने आपला त्रास कमी होऊ शकतो, माझी दोन्ही मूले जाडजूड आणि ताकतवर आहेत. मी अल्लाह जवळ प्रार्थना करते की, माझ्या हातात इतके बळ दे की त्यांनी आपल्याला अटी पूर्ण करणा-्या लेखी उत्तर दिल्यावर मी त्यांचा आपल्या हातुन गळा दाबुन त्यांचा जीव घेईन. अली बंधूंनी इंग्रज सरकारच्या या अटींवर जेलमधून सुटकेला मान्य केले नाही.

लोकमान्य टिळक आणि मिसेस ऍनी बेझंटच्या नेतृत्वाला महाराष्ट्र होमरूल लीग त्या ब्रांचेस देशात सर्व कडे पसरून कार्यरत झाल्या होत्या. त्यांनी या चळवळीत जागोजागी आपल्या भाषणाद्वारे लोकांमध्ये नवीन जोश निर्माण केला. 1917 मध्ये काँग्रेसच्या सभेमध्ये हजेरी लावून मार्गदर्शन केले. २७ ऑगस्ट च्या नंतर बी अम्मा समाजात जागृती उत्पन्न करण्यासाठी सारखे प्रवासात असत. अमृतसर, पेशावर, सरगोधा, लायलपुर, चिटुस, फरोजपुर, रोहतक, सिमला, लुधियाना, जालंदर, सियालकोट इतर अनेक ठिकाणावर जाऊन सभा घेण्यासाठी लांब-लांबचा प्रवास करण्याने खुप आजारी पडल्या. इलाजासाठी लगेच दिल्लीला घेऊन गेले पण १३ नोव्हेंबर १९२४ ला त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.

संदर्भ –

1) लेखक सय्यद नासिर अहमद द्वारा लिखित IMMORTALS या पुस्तकातील इंग्रजी लेखाचा मराठी संक्षिप्त अनुवाद
2)लहू बोलता भी है
3) heritage time’s

अताउल्लाखाँ रफिकखाँ पठाण,
मु. पो. टूनकी, ता. संग्रामपूर,
जि. बुलढाणा, महाराष्ट्र ४४४२०४
संपर्क – ९४२३३३८७२६

आणखी संबंधीत लेख

बख्त खान : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचा मुख्य सेनापती

चंपारण्य सत्याग्रहावेळी ‘‘या’’ मुस्लिम स्वातंत्र्यसेनानीने वाचविले होते गांधीजींचे प्राण… 

स्वातंत्र्यसेनानी मोहम्मद शेर अली खान 

क्रांतिकारी सय्यद मीर नासिर अली 

मौलाना शफी दाऊद    ||   बख्त खान : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचा मुख्य सेनापती 

मौलवी लियाकत अली : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचा महान क्रांतिकारी

हसत हसत फासावर चढले – क्रांतिकारक शहीद अशफ़ाकउल्लाह खान

महान स्वातंत्र्य महिला सेनानी कुलसुम सयानी 

मौलाना हुसेन अहमद मदनी (र. अ.)

महान स्वातंत्र्यता सेनानी हाजी उस्मान सेठ

महान स्वातंत्र्यसेनानी मौलाना मंजूर अहसान एजाजी

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद

गांधीजींच्या आवाहनानंतर ‘‘या’’ मुस्लिम तरूणाने आपली ५०० एकर जमीन दान दिली होती.

‘भारत छोडो’ आणि ‘सायमन गो बॅक’ हा नारा पहिल्यांदा कोणी दिला होता? तुम्हाला माहिती आहे का?

इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारी मौलाना पीर अली खान (र.अ.)

सारे जहाँ से अच्छा गीताचे जनक ||  खिलाफत चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणारे स्वतंत्रता सेनानी मौलाना मोहम्मद अली जौहर (र. अ.)

शेअर करा
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Tags

Related Articles

2 Comments

 1. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र. says:

  बी अम्माचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान खूपच महत्त्वाचे आहे.
  दखलपात्र माहिती. लेखक अत्ताउल्ला पठाण साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

 2. बी अम्माचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान खूपच महत्त्वाचे आहे.
  दखलपात्र माहिती. लेखक अत्ताउल्ला पठाण साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
  ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close