साप्ताहिक सदर

Alak (अलक) || मित्र – अरूणा गर्जे

‘ओळख अलकशी’ साप्ताहिक सदर

Alak (अलक) म्हणजे अति लघु कथा. मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टलवर प्रसिद्ध कवयित्री तथा लेखिका अरूणा गर्जे लिखित ‘ओळख अलकशी’ हे साप्ताहिक सदर दर शनिवारी आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा…

Alak (अलक)

झाडांची कत्तल करताना तेही झाड तोडल्या गेले. ज्यावर पोपटाची ढोली होती. घुबड पोपटाला म्हणाले… “मित्रा, नको काळजी करू. आपण दोघे माझ्या ढोलीत मिळून राहू.”

पोपट :- पण हे कसे शक्य आहे.
घुबड:- का शक्य नाही?

Alak
Alak (अलक) || अरूणा गर्जे

आणखी अलक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी रोज दिवसा झोपतो आणि रात्री जागतो. तू सकाळी उठतो आणि रात्री झोपतो. प्रश्नच सुटला. आता लवकरच पावसाळा सुरू होईल. आपण फळं खाऊन बिया मातीत रुजवू. पुन्हा जंगल उभे राहील. अरे! माणसाने माणुसकी सोडली असली तरी आपली ‘पक्षिकी’ आजही टिकून आहे मित्रा. यावर दोघेही दिलखुलासपणे हसले.

अरूणा सुभाष गर्जे
प्रसिद्ध लेखिका तथा कवयित्री
नांदेड
संपर्क – ९४२२१३०८९९

आणखी अलक वाचण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंकला क्लिक करा…

जुनी चप्पल  ||   नैवैद्य    ||    पिवळी पाने    ||    गुरूऋण    ||   हंडा ||  विश्वास (अलक)

पिझ्झा     ||   उंबरठा    ||    रिकामं घरटं    ||   वास्तू    ||    एकलेपणा  || नवीन वर्ष (अलक) 

आठवणीतलं झाड ||     खरी दिवाळी…  || वेदना   || नजर (अलक)    वाद (अलक)  ||  गुंता (अलक)

अपघात (अलक) || बिदाई (अलक)     || सुखाचे क्षण (अलक) || शापित सौंदर्य (अलक)

चहाचा कप – (अलक)   |बोभाटा – (अलक) ||  वीज (अलक)   || तडजोड (अलक)   || लॉकडाऊन (अलक)

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close