साप्ताहिक सदर

Ambedkarite Ghazal || आंबेडकरवादी गझलेतील सौंदर्यविचार – डॉ. प्रकाश राठोड, नागपूर

Ambedkarite Ghazal || आंबेडकरवादी गझल - साप्ताहिक सदर

Ambedkarite Ghazal || आंबेडकरवादी गझल – साप्ताहिक सदर (भाग ३१)

Ambedkarite Ghazal || “आंबेडकरवादी गझलेचे सर्जनसौंदर्य” हे साप्ताहिक सदर आम्ही मराठी साहित्य वार्ताच्या वाचकांसाठी दर रविवारी सुरू केले आहे. या सदराद्वारे ज्येष्ठ आंबेडकरी गझलकार तथा साहित्यिक प्रमोद वाळके ‘युगंधर’ आणि आंबेडकरवादी साहित्यिक डाॅ. प्रकाश राठोड हे सातत्याने लेखन करीत आहेत. आपले साहित्य मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टलवर प्रसिद्ध करण्यासाठी websahityawarta@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवा. दर्जेदार लिखानाला निश्चत प्रसिद्धी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. – संपादक

Ambedkarite Ghazal || आंबेडकरवादी गझल : काही स्पष्टीकरणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गझलेला केवळ शरीर असून चालत नाही तर मनही असावे लागते. भावना आणि संवेदनाही असावी लागते. गझलेला दुःखांशी संवादी होता आले पाहिजे. वेदनेचे अन्वयार्थ तिला उलगडता आले पाहिजे. भावसंवेदनांनी युक्त असलेली गझल ही जीवनाची गझल असते. जीवनाची गझल ही जीवनाचे कौरुप्य पाहू शकत नाही. जीवनाच्या डोळ्यातील आसवे तिला अस्वस्थच करून सोडतात.

Ambedkarite Ghazal (आंबेडकरवादी गझल)
Ambedkarite Ghazal (आंबेडकरवादी गझल) (फोटो सौजन्य गुगल)

आंबेडकरवादी गझल ही अस्वस्थ काळजाची गझल आहे. शरीर म्हणजे रचना वा आकृतिबंध आणि परपीडेने व्याकूळ होणारे काळीज म्हणजे गझलेचा आशय. उदात्त जीवनाशयाची गझल ही सुंदर गझलच असते. आंबेडकरवादी गझलेचे खरे सौंदर्यच तिच्या जीवनकेंद्री आशयात आहे. परंतु याचा अर्थ इथे तंत्रसैलपणाला वाव आहे असा होत नाही. तंत्रशुद्धता ही गझलेची अवश्योपाधीच असते आणि त्या दृष्टीने या आधीच्या लेखमालेतून सातत्याने लेखन येतच आहे. आंबेडकरवादी गझलेचे आणि आंबेडकरवादी गझलेच्या रचनातंत्राचे गाढे अभ्यासक, ख्यातनाम गझलकार तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रमोद वाळके ‘युगंधर’ यांच्या लेखमालेतून आंबेडकरवादी गझलेच्या आकृतिबंधावर प्रथमच इतके अभ्यासपूर्ण आणि विस्ताराने लेखन येत आहे.

Ambedkarite Ghazal || आंबेडकरवादी गझल : काही स्पष्टीकरणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आकृतिबंधाच्या वा रचनातंत्राच्या अंगाने गझलेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी ते निश्चितच दिशादर्शक ठरेल. त्यामुळे आंबेडकरवादी गझलेचा आकृतिबंधाच्या वा रचनातंत्राच्या अंगाने सौंदर्यविचार मी मांडणार नाही तर या गझलेची आशयनिष्ठ मांडणी करून आंबेडकरवादी गझलेचा सौंदर्यशोध घेण्याचा प्रयत्न मी पुढील लेखांमधून करणार आहे. आंबेडकरवादी गझलेने जीवनवादी आशय घेऊनच इथल्या सांस्कृतिक संघर्षात भाग घेतला आहे. मानवी जीवनाची सौंदर्यमूल्ये अबाधित राहावी आणि इथे सौंदर्यस्वभावी समाज प्रत्यक्षात साकार व्हावा यासाठी या गझलेने इथल्या सांस्कृतिक संघर्षात स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळे या गझलेतील क्रांतिकारी जीवनाशयाला आणि जीवनाच्या सौंदर्यमूल्यांना बगल देऊन आंबेडकरवादी गझलेचे सौंदर्यशोधन करता येत नाही.

Ambedkarite Ghazal || आंबेडकरवादी गझल : काही स्पष्टीकरणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आकृतिबंध ही तर गझलेची अपरिहार्यताच असते. त्यामुळे आंबेडकरवादी गझलेचा सौंदर्यशोध घेताना घडण, रचनातंत्रे वा आकृतिबंध या गोष्टींचा स्वतंत्र आणि वेगळा विचार करण्याची तशी गरज नसते. गझलेची विवक्षित अशी रचनातंत्रे असतात आणि ती गझलकारांना पाळावीच लागतात. त्याशिवाय कुठलाही गेय रचनाप्रकार गझल ठरू शकत नाही, हे यापूर्वीच्या लेखांमधून मी मांडले आहे. आकृतिबंध ही गझलेची अवश्योपाधीच असते असे गृहीत धरूनच आंबेडकरवादी गझलेच्या आशयसौंदर्याचा उलगडा करावा लागतो. आंबेडकरवादी गझलेचा युगीन, क्रांतिकारी आणि मानवतावादी जीवनाशय मध्यवर्ती ठेऊन आणि तंत्रशुद्धतेची संदर्भचौकट मान्य करूनच आंबेडकरवादी गझलेचा विचक्षकपणे सौंदर्यशोध घ्यावा लागतो. त्याशिवाय आंबेडकरवादी गझल आस्वादकांना सौंदर्याची शाश्वत अनुभूती देऊ शकत नाही.

Ambedkarite Ghazal || आंबेडकरवादी गझल : काही स्पष्टीकरणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आंबेडकरवादी गझल ही क्रांतिगझलच आहे. प्रखर क्रांतिकारी आशयाची, प्रखर विद्रोही बाण्याची आणि प्रखर ध्येयवादी जीवनदृष्टीची ही युद्धस्विनी गझल आहे. युगांतराच्या ध्येयाची ती युद्धगझलच आहे. समाजांतर, मूल्यांतर आणि युगांतर ही या गझलेची जन्मध्येयेच आहेत. निकोप मानवत्वाच्या सुप्रतिष्ठेसाठी आणि व्यापक भगिनीभाव आणि बंधुभाव ही मूल्ये इथे रुजावी ही उदात्तता प्रत्यक्षात साकार व्हावी यासाठी आंबेडकरवादी गझल इथल्या सांस्कृतिक संघर्षाची सेनानी झाली आहे.

Ambedkarite Ghazal || आंबेडकरवादी गझल : काही स्पष्टीकरणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आंबेडकरवादी गझल ही खरी चळवळीची गझल आहे. युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्वलज्जहाल क्रांतिप्रेरणेने उदयास आलेल्या परिवर्तनवादी सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींना लागणारे बौद्धिक आणि वैचारिक बळ या गझलेने पुरविले. या चळवळींमध्ये एक नवी वीरवृत्ती जागविण्याचे आणि परिवर्तनाचा अंगार सतत चेतवत ठेवण्याचे महत्कार्य या ध्येयवादी गझलेने केले आहे. भारतीय समाजात सर्वहितकारी आणि सर्वन्यायी जीवनाशयाची बौद्धिक आणि वैचारिक संस्कृती निर्माण करणे ही आंबेडकरवादी गझलेची ध्येये आहेत. ही सर्वांगपरिपूर्ण आणि सर्वांगसुंदर ध्येये मनाच्या अस्वस्थतेतून प्रस्फुटित होत असतात. वंचित-उपेक्षितांविषयीच्या आणि एकूणच सर्व अभावग्रस्तांविषयीच्या असीम कळवळ्यातून या ध्येयांचा सुंदर आविष्कार सतत होत असतो.

Ambedkarite Ghazal || आंबेडकरवादी गझल : काही स्पष्टीकरणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

माणूस या महान मूल्याविषयीच्या अपार कणवेच्या गर्भतळातून ही सौंदर्यस्वभावी जीवनध्येये प्रसृत होत असतात. त्यामुळे आंबेडकरवादी गझलेची सौंदर्यशास्त्रीय मांडणी करताना मानवी जीवनाला अत्तदीप वा स्वयंदीप करणारी आणि सौंदर्यसंपन्न समाजाच्या प्रस्थापनेसाठी जीव पाखडणारी ही उजेडजन्मा क्रांतिध्येये प्राधान्याने विचारात घ्यावी लागतात. आंबेडकरवादी गझल ही क्रांतिकारी आशयाची मातृस्वभावी गझल आहे. या गझलेच्या क्रांतिकारक आशयाची आणि मातृमनस्क स्वभावाची प्रेरणामुळे आंबेडकरवादात आहेत. आंबेडकरवाद हा जीवनाला सुंदर, समतल आणि गतिमान करणारा विचार आहे. या विचारामध्ये मानवी जीवनाची सौंदर्यमर्मे अंतर्भूत झालेली आहेत. त्यामुळे आंबेडकरवाद नावाचा मूलभूत समाजक्रांतीचा आणि सर्वंकष शोषणमुक्तीचा विचार भारतीय आणि वैश्विक परिप्रेक्ष्यात समतायुक्त जीवनाचे महान क्रांतिकारी तत्त्वज्ञान म्हणून परमवंदनीय ठरला आहे.

Ambedkarite Ghazal || आंबेडकरवादी गझल : काही स्पष्टीकरणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आंबेडकरवादी गझलेचा हा जन्मजात क्रांतिस्वभाव आणि समग्र समाजक्रांती घडवून आणण्याचा तिचा उदात्त, व्यापक, उत्कट आणि सर्वहितैषी स्वरूपाचा नितांतसुंदर ध्येयवाद या अभिनव आणि वैशिष्ट्यपूर्ण गझलचिंतनाच्या केंद्रस्थानी ठेऊनच या गझलेची सौंदर्यमर्मे विशद करता येतात. त्याशिवाय आंबेडकरवादी गझलेची सौंदर्यानुभूती घेता येत नाही आणि तिची जीवनलक्ष्यी सामर्थ्येही विशद करता येत नाही. या प्रकारे आंबेडकरवादी गझलेच्या सौंदर्यविषयक जीवनानुभूतींच्या पद्धतशीर व चिकित्सक अभ्यासातून या गझलेचा सौंदर्यशोध घेणे म्हणजे आंबेडकरवादी गझलेच्या सौंदर्यशास्त्राची मांडणी करणेच होय. सौंदर्य या जीवनसंजीवक संकल्पनेच्या तात्त्विक अधिष्ठानावर आंबेडकरवादी गझलेची शास्त्रीय व काटेकोर मांडणी करताना सौंदर्य म्हणजे काय हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

(क्रमशः)

डॉ. प्रकाश राठोड,

नागपूर
संपर्क – 99234 06092

आणखी संबंधित लेख

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

 आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

आंबेडकरवादी गझल : संकल्पना आणि स्वरूप  (भाग १) 

आंबेडकरवादी गझल : संकल्पना आणि स्वरूप  (भाग २) 

आंबेडकरवादी गझल : संकल्पना आणि स्वरूप (भाग ३) 

आंबेडकरवादी गझलमध्ये येणारे रदीफ

आंबेडकरवादी गझलमधून येणारे काफिया

आंबेडकरवादी गझलमधून येणारे स्वरकाफिया

आंबेडकरवादी गझलेतील अलामत आणि यती 

आंबेडकरवादी गझलेतील गझलियत, मतला आणि मक्ता 

वृत्तांची ओळख || आंबेडकरवादी गझलचे सर्जनसौंदर्य 

गझलच्या वृत्तातील मात्रा मोजताना…

आंबेडकरवादी गझलचे जनक : वामनदादा कर्डक

वामनदादा कर्डक यांच्या गझलांची वृत्तरचना

वामनदादा कर्डक यांच्या गझलांची वृत्तरचना (भाग ४)

वामनदादा कर्डक यांच्या गझलांची वृत्तरचना (भाग ६)

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close