साप्ताहिक सदर

AMBEDKARWAD || उत्सवांची मालिका : मानसिक गुलाम करणारे षडयंत्र – डॉ. सर्जनादित्य मनोहर

AMBEDKARWAD || समकालीन भारतातील जातीयतेचे प्रश्न (साप्ताहिक सदर) – डॉ. सर्जनादित्य मनोहर (भाग १८)

आंबेडकरवाद AMBEDKARWAD || समकालीन भारतातील जातीयतेचे प्रश्न (भाग – १७) वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उत्सवांची मालिका म्हणजे माणसांना मानसिक गुलाम करणारी षडयंत्रेच आहेत. ही षडयंत्रे अभौतिक स्वरूपाची असतात. अदृश्य असतात. ती प्रत्यक्षात दिसत नसली तरी त्या षडयंत्रांचा प्रभाव मात्र लोकांच्या मनावर सतत कायम असतो. हा प्रभाव सतत टिकून राहावा, अंकित मनांनी विचारप्रक्रियेत सहभागी होऊ नये, त्यांच्या मेंदूला विचार करण्याची सवय लागू नये आणि ते भक्ती – मुक्तीच्या वेडगळ मोहमायेत सतत गुंतून राहावे यासाठी सत्तास्वामींना उत्सवप्रिय मनांचा आढावा घेणारे भौतिक स्वरूपाचे धर्मांध आविष्कार सतत करावे लागतात.

आंबेडकरवाद AMBEDKARWAD || समकालीन प्रश्न साप्ताहिक सदरातील आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उत्सवमालिका हा एक भौतिक स्वरूपाचा धर्मांध आविष्कारच आहे. उत्सव हे एक नियोजित असे कटकारस्थान आहे. माणसाला गुलाम करणारे ते षडयंत्रच आहे. सत्तेचे धूर्त मुनसुबे पुढे रेटणारे ते तृष्णांध राजकारण आहे. या धूर्त षडयंत्रांचा भौतिक आविष्कार उत्सवयंत्रनांमधून होत असतो. म्हणून या देशातील उत्सवयंत्रना अत्यंत सशक्तपणे राबवण्यात आली आहेत आणि आजही राबवली जाते आहे. ही उत्सवयंत्रना शोषणव्यवस्थेचा एक भाग झालेली आहेत. या उत्सवयंत्रनांचे रिमोट शोषणसत्ता आणि धर्मांध सत्तास्वामींच्या हातात असते. या रिमोटचे काम माणसाला गुलाम करणाऱ्या केवळ उत्सव मालिका दाखवणे इतकेच असते.

माणसाच्या मानसिक गुलामीचे उत्सव शोषणसत्तेला समर्थ आणि मजबूत करणारेच असतात. जातींच्या विषारी झुडुपांना खतपाणी घालणारे असतात. असे उत्सव मानवी जीवनात वैचारिकशून्यता आणि चिकित्साविहीन समाज जन्माला घालणारे असतात. या उत्सवातून जातअस्मिता आणि धर्मअस्मिता घट्ट होऊन मूलतत्त्ववाद बलशाली होत असतो आणि मानवी जीवनातील विषारी प्रश्नांचे धुरे विस्तारित होतानाच टोकदारही होत जातात. माणसाला विचारभंजन करणारे आणि मानवी मेंदू कुपोषित करणारे जहरी प्रश्नांचे उत्सवी धुरे-बंधारे जातीच्या सीमा बळकट करीत असतात आणि माणूस आपले स्वतंत्र माणूसपणाचे अस्तित्त्व गमावून बसतो. धर्मावलंबी जीवन जगणारा माणूस जीवनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा संबंध प्रारब्धाशी जोडून नशीबालाच दोष देत असतो.

आंबेडकरवाद AMBEDKARWAD || समकालीन प्रश्न साप्ताहिक सदरातील आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामुळे विचारशील माणूस धार्मिक उत्सवाने चिकित्साशून्य आणि तर्कहीन होतो, ईश्वरावलंबी होतो, उत्सवप्रिय आणि रंजनवादी होतो. तो जीवनवादी होऊ शकत नाही. तो अत्तदीप होऊ शकत नाही. म्हणूनच शोषणसत्तेने निर्माण केलेल्या प्रश्नांचे कोडे त्याला उलगडता आले नाही. तसा प्रयत्नदेखील त्याने केला नाही. ज्यांनी हे कोडे उलगडले ते आंदोलन झाले. क्रांतिऊर्जा झाले. जीवनाची चिकित्सा करू लागले आणि जीवनवादी झाले. परंतु ज्यांना उत्सवाच्या झुंडीतून बाहेर पडता आले नाही ते आजही पंधरा लाखाच्या भ्रमात आणि विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षाच जातीय प्रश्नांची जन्मकूस ठरते की काय अशी शंका उपस्थित होण्याला वाव आहे.

आंबेडकरवाद AMBEDKARWAD || समकालीन प्रश्न साप्ताहिक सदरातील आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कारण या जन्मकुसीतून मंदी जन्माला आली हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. याचा अर्थ धर्मवाद्यांच्या शोषणग्राफीने या देशातील सामान्य माणसाला फसवले आहे असाच होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयोगशाळेतील सोनोग्राफीने केलेले लिंगनिदान विकास जन्माला घालणारेच आहेत. माणसाला विश्वासार्हता देणारे निष्कर्ष आहेत. त्याकरिता मानवी मनाची पुनर्रचना करावी लागते. पुनर्रचित मन हेच परमसुंदर आणि सर्वहितैषी मन असते. ते विज्ञाननिष्ठ मन असते. चिकित्सक आणि तर्कशुद्ध मन असते. तर्कशुद्ध मनाचा आविष्कार सम्यक समाज निर्माण करणाराच असतो.

आंबेडकरवाद AMBEDKARWAD || समकालीन प्रश्न साप्ताहिक सदरातील आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या देशातील समाजवादी लोकशाही धर्मवाद्यांच्या हातात गेली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयोगशील सोनोग्राफीचे महत्त्वाचे अवयव नेस्तनाबूद होऊ लागले. भारताच्या संसदीय लोकशाहीत धर्मवाद्यांची मोनोपली हस्तक्षेप करू लागली आणि आज लोकशाहीला एकाधिकारशाहीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले. ही एकाधिकार प्रवृत्ती म्हणजे हुकूमशाहीच आहे. ती धर्मांध प्रवृत्तीच आहे. दोन माणसात भेदाभेद निर्माण करणारी ही मानसिक प्रवृत्ती धर्माच्या मूलतत्त्ववादावर उभी असते आणि मूलतत्त्व राबवणारे आविष्कार धर्मांध प्रवृत्तीत दडलेली असतात. आज उत्सवांची गर्दी आणि गर्दींचे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. या गर्दीत केवळ माणसांच्या निर्बुद्ध झुंडी दिसतात. झुंडींचे जीवघेणे आविष्कार दिसतात. हे आविष्कार माणसांची ओळख पुसून टाकणारेच आविष्कार आहेत. प्राण्यांच्या कळपात संस्कृती नसते, विचार नसतो. तसेच गर्दीच्या झुंडीला विवेक नसतो.

हे ही वाचा… आंबेडकरवाद AMBEDKARWAD || समकालीन प्रश्न साप्ताहिक सदरातील आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ही झुंडशाही म्हणजे माणसाला विचारशून्य करणारी, त्याला शोषणव्यवस्थेचा दास करणारी, त्याला डिटेंशन कॅम्पसारख्या कोंडवाड्यात घेऊन जाणारी आहे. डिटेंशन कॅम्पसारखे कोंडवाडे म्हणजे धर्म व जातींचेच कोंडवाडे आहेत. आज या जातींच्या कोंडवाड्यांचे विविध वर्ग तयार होताना दिसतात. जातींची मंगल कार्यालये, जातींच्या विवाहसंस्था, जातींच्या शिक्षणसंस्था, जातींचे सभागृह, जातींच्या वस्त्या, वस्त्यांची नावं, शहरांची नावं, गावांची नावं आणि माणसांची आडनावं ही जातीय कोंडवाड्यांचीच नावं आहेत. ही नावं म्हणजे जातीयता घट्ट करणारे वर्गच होत. या वर्गवारीतून परस्पर घृणाच तयार होत असते आणि ही घृणा जातीय प्रश्नांचे कारण ठरते.

आंबेडकरवाद AMBEDKARWAD || समकालीन प्रश्न साप्ताहिक सदरातील आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


(क्रमशः)

डॉ. सर्जनादित्य मनोहर
आंबेडकरवादी अभ्यासक, नागपूर

आणखी संबंधित लेख

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close