बातमीपत्र

First Digital Marathi Literary Conference || संविधान हीच खरी भारतीय संस्कृती आहे ; अर्जुन डांगळे

मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

First Digital Marathi Literary Conference

First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

अकोला/प्रतिनिधी – फुले-शाहु-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमची संस्कृती कोणती? माझ्या मते, संविधान हीच खरी भारतीय संस्कृती आहे. कारण संविधानाने सामाजिक पूनर्रचनेचा विचार मांडला आहे. त्यामुळे संविधानाचे संवर्धन करणे, त्याची जपवणूक करणे, अंमल करणे ही संस्कृती आपण जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले. ते मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ता आयोजित First Digital Marathi Literary Conference || पहिल्या डिजिटल मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.

First Digital Marathi Literary Conference || शाहीरी जलसा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

First Digital Marathi Literary Conference
First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य वार्ता युट्युब चॅनलवर लाईव्ह संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी निलेश पंडित, न्यूझिलंड यांनी केले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. डाॅ. संतोष हुशे, मेहता पब्लिसिंग हाउसचे संचालक सुनील मेहता, ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, प्रा. डाॅ. रेखा मेश्राम, कवयित्री मनीषा साधू, अद्वैत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रविण सोनोने यांनी मानले. First Digital Marathi Literary

First Digital Marathi Literary Conference || शाहीरी जलसा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

संमेलनाच्या सुरूवातीला शाहीर सुमीत धुमाळ यांचा शाहीरी जलसा संपन्न झाला. तद्ववतच मराठी साहित्य वार्ताचे प्रमुख अमरदीप वानखडे यांनी प्रास्ताविक केल्यांनतर उपस्थित मान्यवरांनी संमेलनासाठी शुभेच्छ्यापर मनोगत व्यक्त केले. First Digital Marathi Literary

First Digital Marathi Literary Conference || उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढे बोलतांना डांगळे म्हणाले की, साहित्यात विविध प्रवाह असले तरी साहित्य हे साहित्य असते ते स्वतःच जिवंत आणि मनाला भिडणारे असे असले पाहिजे. साहित्याच्या नावाखाली शब्दबंबाळ किंवा उरबडवेपणाचे लिखाण, बटबटीत लेखन हे चांगल्या साहित्याचे लक्षण नव्हे. साहित्य निर्मिती ही अतिशय गांभीर्यपूर्वक व चिंतनशील कृतीतून साकारणारी गोष्ट आहे. आणि याच प्रेरणेतून हे सकस झाली तरच सकस आणि जिवंत साहित्यनिर्मिती करून मराठी साहित्याचे आणि संस्कृतीचे संवर्धन करू शकतो. डिजिटल क्रांती हा काही चमत्कार नाही किंवा भाकडकथा नाही तर विज्ञानामुळे हे शक्य हे शक्य झाले आहे. ही काही आध्यात्मिक किंवा दैवी शक्ती नाही. हा वैज्ञानिक क्रांतीचा सुस्पष्ट अविष्कार आहे. म्हणूनच साहित्य निर्मिती करताना आपली मानसिक ठेवण युगसुसंगत ठेवली पाहिजे. First Digital Marathi Literary

First Digital Marathi Literary Conference || काव्यसंवाद कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

संमेलनाचे उद्घाटक निलेश पंडित बोलतांना म्हणाले की, उत्तम साहित्याचा झपाटा आणि अवाका वाढत आहे तसाच अत्यंत निकृष्ठ आणि हिनकर साहित्याचा जोरही वाढत आहे. त्याचे यथायोग्य नियंत्रण आणि नियोजन करणे हे मोठे आवाहन मराठी साहित्यासमोर आहे. आजचे डिजिटल साहित्य संमेलन आणि अशाप्रकारचे विविध उपक्रम या आवाहनाला न्याय देतील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. First Digital Marathi Literary

First Digital Marathi Literary Conference || परिसंवाद पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन
First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन

कोरोना काळात साहित्यिकांची जबाबदारी या विषयावर काव्यसंवाद हा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. यामध्ये ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर, अरूण म्हात्रे, कवयित्री निरजा, रवींद्र लाखे, दासू वैद्य यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संकेत म्हात्रे यांनी केले. मुंबई विद्यापीठातील प्रा. डाॅ. मंगेश बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये डिजिटल माध्यमांचे योगदान या विषयावर परिसंवाद संपन्न झाला यामध्ये प्रा. डाॅ. सुनीता धर्मराव, अॅड. लखनसिंग कटरे यांनी सहभाग नोंदविला. First Digital Marathi Literary

First Digital Marathi Literary Conference || गजल मुशायरा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन
First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन

पुण्याच्या ज्येष्ठ गजलकार प्रभा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली गजल मुशायरा संपन्न झाला यामध्ये प्रमोद वाळके, अझीझ खान पठाण, उर्मिला वाणी, जनार्दन केशव, प्राजक्ता पटवर्धन आदींनी सहभाग नोंदविला. ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवयित्रींचे कविता संमेलन संपन्न झाले. त्यामध्ये संध्या महाजन, अश्विनी अतकरे, शितल राउत, कल्पना अंबुलकर, रंजना कराळे, अंजली ढमाळ आदींनी सहभाग नोंदविला. समारोप सत्राचे अध्यक्ष धनंजय तडवळकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. रेश्मा जाधव, आनंद चक्रनारायण, अमरदीप वानखडे उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये शाहीर रंगराव पाटील, प्रा. प्रतिभा सराफ, प्रा. महादेव लुले, प्रविण बोपुलकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या संमेलनाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. First Digital Marathi Literary

First Digital Marathi Literary Conference || निमंत्रित कवयित्रींचे कविता संमेलन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन
First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन

ग्रंथालयांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ करा ; डिजिटल साहित्य संमेलनातुन थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी
डिजिटल साहित्य संमेनातुन मेहता पब्लिसिंग हाउसचे संचालक सुनील मेहता यांनी ग्रंथालयांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ करण्यात यावे अशी मागणी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. मांडलेल्या या भुमिकेचे संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे, उद्घाटक निलेश पंडित, स्वागताध्यक्ष प्रा. डाॅ. संतोष हुशे, ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, कवयित्री मनीषा साधू, प्रा. डाॅ. रेखा मेश्राम आदींनी जोरदार समर्थन केले. त्यानंतर मराठी साहित्य वार्ताच्या वतीने सर्वानुमते ठराव घेवुन शासनाकडे या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे अमरदीप वानखडे यांनी सांगितले. First Digital Marathi Literary

First Digital Marathi Literary Conference || समारोप कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन
First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन

डिजिटल साहित्य संमेलनाने केला महिलांचा सन्मान
मराठी साहित्य वार्ताचे डिजिटल संमेलन दिवसभर लाईव्ह स्वरूपात सुरू होते. या संमेलनामध्ये आयोजित उद्घाटन सोहळा, कविता संमेलन, गझल संमेलन, काव्यसंवाद, परिसंवाद या विविध सत्रांमध्ये आणि पुरस्कारामध्ये महिलांना विशेष प्रतिनिधीत्व दिले आहे. त्याबद्दल साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणेच्या अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांनी मराठी साहित्य वार्ताचे आभार व्यक्त केले. First Digital Marathi Literary

First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन
First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन

संपूर्ण साहित्य संमेलन पाहण्यासाठी येथे क्लिक करा. मराठी साहित्य वार्ता युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close