साप्ताहिक सदर

Humility विनम्रता… (संस्कारधन Sanskardhan) || – मंगला चौरे

संस्कारधन - साप्ताहिक सदर

Humility विनम्रता… || Sanskardhan (संस्कारधन)- साप्ताहिक सदर भाग-१९

Humility विनम्रता… || Sanskardhan (संस्कारधन)- साप्ताहिक सदर || उद्धट, उथळ,मोकाट, टुकार, बावळट इत्यादी इत्यादी… विशेषण आपल्या मुलांच्या बाबतीत कोणी लावली तर आपल्याला आवडणार नाही. नाही ना? मग मुलं लहान असताना त्यांच्यातील काही वाईट सवयी असतील तर त्या तेव्हाच बदला. मूल जेव्हा बोलायला शिकते तेव्हा त्याला लाडात काहीही बोलायला शिकवतात. ते तसंच बोलतं. पण मोठी झाला की ती सवय बदलायला जड जातं. त्याच्या समोर कोणाला तरी मारणे, मोठ्याने बोलणे, चोरी करणे, दुजाभाव, वाईट बोलणे, माघार न घेणे या गोष्टी नकळत आई-बाबांकडून घडल्या तर मुलंही तशीच घडतात.

हे ही वाचा…Sanskardhan (संस्कारधन)

Humility विनम्रता...
Humility विनम्रता… || photo credit google

विनम्रता कशाशी खातात? हे त्यांच्या गावीही नसतं. आणि मग ते वरील यादीत हळूहळू बसायला लागतात. त्यासाठी आपल्या मुलांची आपणच खूप काळजी घ्यावी. आणि विनम्रता अंगी असेल ना… तर माणूस आयुष्यभर सुखी असतो. त्याच्या जीवनात दुःख नसते असं नाही, पण ते दुःख हे सुखाची दुसरी बाजू आहे हे त्याच्या विनम्र मनाला पटत असतं. आणि “सुख पर्वता एवढे, दुःख जवा एवढे” अशी त्याची धारणा होती. सुखदुःख शिवाय जीवन परिपूर्ण नाही. सुखा सोबत दुःखही असतात हे एकदा मनाला पटलं तर जीवनात येणार्‍या संकटाचा, दुःखाचा त्रास होत नाही. त्यासाठी आपल्यात हवी विनम्रता.

हे ही वाचा…Sanskardhan (संस्कारधन)

“विद्या विनयेन शोभते” हे शालेय जीवनात आपण शिकतोच. पण कालांतराने हे सुभाषित हळूहळू कसं विसरतात कोणास ठाऊक? आणि उलटच घडत जातं. उच्चविद्याविभूषित लोक या सुभाषिताला पायदळी तुडवताना दिसतात. फार वाईट वाटतं हो. “ज्ञानामुळे मान मिळतो” एवढी विनम्रता तरी जवळ असावी.

हे ही वाचा…Sanskardhan (संस्कारधन)

भेटू पुढील भागात????????

मंगला चौरे
लेखिका, शिक्षक सेवाव्रती
औरंगाबाद

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close