लोकसंवाद

Lokhitwadi|| “लोकहितवादींची शतपत्रे” – सौ. वर्षा दौंड, मुंबई

Lokhitwadi|| "लोकहितवादींची शतपत्रे"

Lokhitwadi|| “लोकहितवादींची शतपत्रे”

“मनशक्ती” दिवाळी अंक 2020 वाचताना त्यातील एक लेख, “इतिहास उगाळला जातो” वाचनात आला .”रामशास्त्री निस्पृहतेचे निर्मळ रूप”या शीर्षकाखाली असलेल्या लेखात, रामशास्त्री प्रभुणे यांचे चरित्र “लोकहितवादी” वाचून कळेल हे वाक्य वाचले आणि मुंबई ग्रंथालयातून डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी संपादन केलेले “लोकहितवादींची शतपत्रे” पुस्तक घेऊन आले, आणि पुस्तक तसेच लोकहितवादींची विचारसरणी, देशप्रेम, त्यांची तळमळ, समाजाविषयीची कळकळ यापुढे नत झाले. त्यावेळच्या समाजाच्या स्थिती चे जे जे वर्णन त्यांनी आपल्या पत्रांमध्ये केले आहे ते वाचून तर हतबद्धच झाले!

Lokhitwadi|| “लोकहितवादींची शतपत्रे” एवढीच सांगड फक्त लहानपणी परिचित होती. त्यापुढे मात्र इतिहास फार काही माहीत नव्हता. अगदी मोघम. मोडका तोडका. आजपर्यंत शतपत्रे म्हणजे नेमके काय आहे? हे माहीत नव्हते. कला शाखेकडे वळून, इतिहास विषय किंवा मराठी विषय घेऊन जे शिकले त्यांना हे माहित असेल! मी असे म्हणत नाही, की सर्वांनाच माहीत नसेल! तरी पण माझ्यासारख्या काहींनी शतपत्रे काय होती? ती कशी लिहिली? त्या मागचा उद्देश काय? हे जाणून घ्यावे म्हणून हा लेख तुमच्यासाठी…

कोण होते लोकहितवादी? लोकहितवादींचीचे मूळ नाव गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म 18/2/1823 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव सिधये असे होते. देशमुख हे वतनावरून पडलेले नाव. लोकहितवादी हे फार मोठे लेखक होते. त्यांनी 1848 साली आपल्या लेखनास “शतपत्रे” पासून प्रारंभ केला. ही सर्व पत्रे त्यांनी समाजातील लोकांना प्रेरणा मिळावी, अज्ञानाच्या अंधकाराततून बाहेर पडावे म्हणून खूपच तळमळीने लिहिलीत. “ज्ञान हे सर्व सन्मानाचे, पराक्रमाचे, बलाचे, ऐश्वर्याचे मूळ आहे अशी त्यांची पूर्ण श्रद्धा होती.

“स्वजना”ना शहाणे करणे हा त्यांच्या लेखनाचा हेतू होता. त्यांची शतपत्रे “प्रभाकर” या साप्ताहिकातून 1848 ते1850 या दरम्यान प्रसिद्ध झाली. त्यांच्या सर्व लेख संभारापैकी शतपत्रांनी त्यांची खरी कीर्ती झाली व आजही शतपत्रांचे लेखक म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्यांचे सर्व क्रांतिकारक मूलगामी विचार शतपत्रातच आले आहेत, म्हणून” लोकहितवादी “ही श्री. गोपाळ हरी देशमुख यांना मिळालेली पदवी सार्थ आहे.

Lokhitwadi|| “लोकहितवादींनी 108 पत्रे लिहिली आहेत. त्यांनी शतपत्रे लिहिली तेव्हा ते अवघे पंचवीस वर्षांचे होते. इसवीसन अठराशे अठरा साली पेशवाईचा अस्त झाला आणि मराठ्यांचे साम्राज्य बुडाले. त्यानंतर दीडशे वर्षांच्या काळात नव भारताची निर्मिती झाली. या नवनिर्मितीच्या महा कार्यात काम करणाऱ्यांमध्ये लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांचे स्थान फार मोठे आहे.

स्वतंत्र चिंतन करण्याचे सामर्थ्य, निर्भय प्रतिपादन, गाढा व्यासंग, मत परिवर्तनाचा मार्ग, प्रखर-जहरी, कडवट भाषा व तळमळ या लेखनशैली च्या माध्यमातून लोकहितवादींनी समाजाला उद्देशून जी शतपत्रे लिहिली ती अचंभित करतात. पुस्तक हातातून सोडावेसे वाटत नाही. तेव्हा मित्रांनो! कधी वेळ मिळेल तेव्हा लोकहितवादींची शतपत्रे जरूर जरूर वाचा! आणि जाणून घ्या भारत कसा होता! अत्यंत वाचनीय पुस्तक.

Lokhitwadi|| “लोकहितवादींची शतपत्रे” – संपादक : डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे,
कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे

सौ. वर्षा दौंड, मुंबई
संपर्क – ९७५७४३०६८५

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close