संपादकीय

Marathi Sahitya Warta || पहिल्या डिजिटल मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अर्जुन डांगळे ; तर उद्घाटक म्हणुन निलेश पंडित

पहिले डिजिटल साहित्य संमेलन दि. १ आणि २ मे २०२१ रोजी मराठी साहित्य साहित्य वार्ता युट्युब चॅनलवर आयोजित करण्यात आले आहे.

Marathi Sahitya Warta || पहिल्या डिजिटल मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणुन ज्येष्ठ समाजसेवक प्रा. डाॅ. संतोष हुशे

मुंबई/प्रतिनिधी:- मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र Marathi Sahitya Warta || मराठी साहित्य वार्ता (वेब पोर्टल, युट्युब चॅनल आणि फेसबुक पेज)च्या वतीने पहिले डिजिटल साहित्य संमेलन दि. १ आणि २ मे २०२१ रोजी मराठी साहित्य साहित्य वार्ता युट्युब चॅनलवर आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत अर्जुन डांगळे तर उद्घाटक म्हणुन न्यूझीलंड येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी निलेश पंडित असणार आहेत तर स्वागताध्यक्ष म्हणुन ज्येष्ठ समाजसेवक प्रा. डाॅ.संतोष हुशे उपस्थित राहणार आहेत. अशी घोषणा मराठी साहित्य वार्ताचे मुख्य संपादक अमरदीप वानखडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Marathi Sahitya Warta || मराठी साहित्य वार्ताच्या वतीने गेल्या वर्षभरापासुन विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम डिजिटल माध्यमातुन राबविण्यात आलेले आहेत. येत्या १ मे रोजी (महाराष्ट्र दिनी) या संपुर्ण उपक्रमाला एक वर्ष पुर्ण होत आहे. त्या पाश्र्वभुमीवर डिजिटल साहित्य संमेलनाचे नियोजन करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रविण बोपुलकर, पवन गवई, राजेंद्र सोमवंशी आदींनी केले आहे.

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close