लोकसंवाद

Seminar || परिसंवाद – मराठी साहित्य वार्तामुळे घरबसल्या उच्च विद्या विभुषितांचा सहवास लाभला… – वर्षा दौंड

मराठी साहित्य वार्ता आयोजित पहिल्या डिजिटल मराठी साहित्य संमेलनातील परिसंवाद (Seminar) परिसंवादाची समीक्षा करणारी प्रसिद्ध लेखिका वर्षा दौंड, मुंबई यांची प्रतिक्रिया…

मराठी साहित्य वार्ता आयोजित पहिल्या डिजिटल मराठी साहित्य संमेलनातील परिसंवाद (Seminar) परिसंवादाची समीक्षा करणारी प्रसिद्ध लेखिका वर्षा दौंड, मुंबई यांची प्रतिक्रिया…

Seminar || परिसंवाद – मराठी साहित्य वार्ता आयोजित पहिल्या डिजिटल मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘‘मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये डिजिटल माध्यमाचे योगदान’’ या विषयावर आयोजित परिसंवाद संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ. मंगेश बनसोड हे होते. तर डाॅ. सुनीता धर्मराव, अॅड. लखनसिंग कटरे आदींनी या परिसंवादामध्ये सहभाग घेतला होता.

Seminar || परिसंवाद संपुर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

शनिवार दिनांक 1 मे रोजी “मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळी”चे अग्रगण्य मुखपत्र “मराठी साहित्य वार्ता” आयोजित मराठी साहित्य वार्ताच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त “पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन” पार पडले. या संमेलनात दिवसभरात अनेक कार्यक्रम या एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळेत साजरे झाले. सर्वच कार्यक्रम लाईव्ह होते. त्या त्या वेळात अतिशय उत्तम रीतीने ते साजरे झाले. आणि म्हणूनच त्यामागील सूत्रधार साहित्य वार्ताचे मुख्य संपादक श्री. अमरदीप वानखडे व त्यांची संपूर्ण टीम यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Seminar || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन
First Digital Marathi Literary Conference || मराठी साहित्य वार्ताचे पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन

यातीलच एक कार्यक्रम, जो शनिवारी 1 मे रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी आयोजित केला होता तो म्हणजे “परिसंवाद.” परिसंवादाचा विषय होता “मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये डिजिटल माध्यमांचे योगदान.” अध्यक्षस्थान मा. डॉ. मंगेश बनसोड, मुंबई यांनी भूषवले आणि सहभागी वक्ते होते मा. डॉ. सुनिता धर्मराव, पुणे व मा. ऍड. लखनसिंग कटरे, गोंदिया. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले नरेंद्र लोणकर यांनी. सदर कार्यक्रम मी स्वतः लाईव्ह उपस्थित राहून ऐकला. सूत्रसंचालक लोणकर यांनी परिसंवादात भाग घेतलेल्या तीनही विद्वानांची ओळख करून दिली तेव्हा, त्यांच्या विद्येचा व्यासंग आणि पदव्या आणि साहित्य संभार ऐकून चकित झाले.

Seminar || परिसंवाद संपुर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठी साहित्य वार्ता च्या माध्यमातून घरी बसूनच अशा विद्याविभूषित व्यक्तींचा सहवास मिळतो याचा खूप आनंद वाटला. खूप धन्यवाद! मराठी साहित्य वार्ता. परिसंवादास सुरुवात पुण्याच्या डॉ. सुनीता धर्मराव यांनी केली. आणि त्यांच्या विचारांची मांडणी ऐकण्यात गुंगून गेले. त्यांचे मत पटत ही गेले. आपले विचार मांडताना त्या म्हणाल्या की, माणसाच्या आयुष्यात बदल घडण्यात जो वेळ लागला व बदल घडले त्यात पहिली क्रांती म्हणजे कृषी क्रांती. दुसरी क्रांती म्हणजे सोळाव्या शतकात घडलेली औद्योगिक क्रांती. आणि तिसरी क्रांती म्हणजे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेली “डिजिटल क्रांती.”

Seminar || परिसंवाद संपुर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

21 व्या शतकात आणि भविष्यातही आपले अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे ती डिजिटल क्रांतीनेच! हे सर्वांनाच आता उमगले आहे. मा. सुनिता धर्मराव मॅडम म्हणाल्या की, मराठी साहित्य हे अभिव्यक्तीचे साधन आहे. पूर्वी ही अभिव्यक्ती पुस्तक रूपाने प्रकाशित होत असे पण आज मात्र माध्यम बदलले आहे. आज सर्वत्र डिजिटल माध्यम आपले वर्चस्व गाजवत आहे. डिजिटल माध्यमात टीव्ही, फेसबुक, इ-बुक, व्हिडिओ पीडीएफ, ॲप्स, गुगल, व्हाट्सअप ह्या सर्व माध्यमांचा समावेश आहे. एमकेसीएल ने आणलेल्या नवीनअँप चे नाव त्यांनी घेतले.

Seminar || परिसंवाद संपुर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

गुगल हे डिजिटल माध्यमाचे महाद्वार आहे असेही त्या म्हणाल्या. डिजिटल माध्यमामुळे मराठी साहित्याला मराठी भाषेला नवीन झळाळी प्राप्त झालेली आहे. मातृभाषेतून अभिव्यक्त होण्याला देखील हे माध्यम खूपच प्रभावशाली आहे. तसेच त्या हेही म्हणाल्या की, “नवोदित लोकांना व्यक्त होण्यासाठी एक चांगले माध्यम म्हणजेच “डिजिटल माध्यम.” एक नवोदित म्हणून त्यांचे विचार पटले.मॅडमने येथे एक फारच उच्च विचार आणि उदार असा विचार मांडला मला तो त्यांचा विचार खूपच आवडला. मुद्दा असा होता की डिजिटल माध्यमामुळे साहित्याला एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे पण अशीही त्यांच्या वर्तुळात चर्चा झाली की, लोक आता काहीही लिहू लागले आहेत व त्याचा दर्जा राहिला नाही!

Seminar || परिसंवाद संपुर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पण मला खूप आवडले की मॅडम ने प्राधान्य दिले ते व्यक्त होण्याला, कारण लिहिणारा अत्यंत पोटतिडकीने आपली भावना व्यक्त करत असतो आणि वाचक हा सुज्ञ आहे. त्याला कान आहेत, नजर आहे. प्रत्येक वाचकाने चांगले आणि वाईट हे स्वतः ठरवावे. हिणकस आणि दर्जेदार हे आधी ठरवण्यापेक्षा व्यक्त होणे हे खूप महत्त्वाचे! त्यांचे हे विचार आवडले मला ! प्रत्येक लेखणी किंवा लेखन शैली ही दर्जेदार असेलच असे आपण आधीच ठरवू शकत नाही पण व्यक्त होण्याची भावना महत्त्वाची.

Seminar || परिसंवाद संपुर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

करोना च्या काळामध्ये आधार मिळाला तो डिजिटल माध्यमांचा !न्युज पेपर सुद्धा आपण डिजिटल वर पीडीएफ चा रुपामध्ये पाहू शकतो. हा एक चांगला बदल आहे. कवितेची निर्मिती, रेसिपी, सामाजिक विषयांवर कार्यक्रम, ऐतिहासिक साहित्य हे सर्व आपल्याला आता डिजिटल मध्ये उपलब्ध होऊ शकते हा एक चांगला बदल झालेला आहे आणि मराठी साहित्याला एक नवी उभारी आलेली आहे. विशेष म्हणजे त्या म्हणाल्या की, रसिक ,वाचक आणि प्रेक्षक यामधील अंतर हे डिजिटल माध्यमामुळे खूप कमी झालेले आहे.

Seminar || परिसंवाद संपुर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मुख्य बदल म्हणजे प्रमाण भाषेतच नव्हे तर मुक्तपणे आणि बोलीभाषेत व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला या माध्यमामुळे मिळाले आहे. प्रकाशनाची जलद संधी देखील मिळते. इंटरनेट आणि गूगल हे उत्तम असे डिजिटल माध्यम आहेत. भावना अभिव्यक्तीचा आनंद नवोदितांना देण्यासाठी डिजिटल माध्यम अत्यंत उपयोगी आहे. मराठी प्रादेशिक भाषेतील अंतर आणि गैरसमज कमी झाले आहेत. बोलीभाषेची ओळख होते आहे. आणि बोली भाषेचे सौंदर्य देखील कळून येते. सांस्कृतिक चळवळीला समृद्धी प्राप्त झाली आहे. आणि हे सर्व साहित्य अल्प दरामध्ये जगा पुढे येत आहे. डिजिटल ग्रंथालय निर्माण झाली आहेत. अक्षय मराठी लोकसाहित्य निशुल्क किंवा माफक दरामध्ये उपलब्ध होत आहे. साहित्याला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. ते जगभरात पोहोचते आहे.

Seminar || परिसंवाद संपुर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

साहित्य समाजाचा चालताबोलता इतिहास आहे. असेही त्या म्हणाल्या. याच डिजिटल माध्यमातून परिसंवादाचे दुसरे वक्ते सन्माननीय एडवोकेट लखन सिंग कटरे, गोंदिया येथून आपल्याशी संवाद साधत होते. आपल्या विचारांना सुरुवात करतांना ते म्हणाले की, मा. सुनीता धर्मराव मॅडमने त्यांना विषय सोपा करून दिला आहे. स्व:चे प्रकटीकरण आणि स्व: एतरांचा स्व: जाणून घेणे या दोन गोष्टी मानवाच्या मनाच्या मूलभूत इच्छा असतात, असे ते म्हणाले. आणि बरोबरच आहे. प्रत्येक कवितेत/कथेमध्ये लेखक जरी काल्पनिक लिहीत असला तरी सुद्धा त्या लेखात, कथेमध्ये, कवितेमध्ये त्याचे स्वत्व किंवा आत्मचरित्र थोडेसे तरी प्रकट झालेलेच असते.

Seminar || परिसंवाद संपुर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ही प्रकटीकरणाची इच्छा तिच्या परीघ विस्ताराची इच्छा डिजिटल माध्यमामुळे मोकळी झाली आहे. भावनेला साहित्याला असीमित असा परीघ मिळाला आहे. Newzeeland हुन उदघाटन करणारे मा. निलेश पंडित साहित्य संमेलनाला लाभले हे डिजिटल माध्यमामुळेच शक्य झाले हे उदाहरण देखील दोन्ही वक्त्यांनी दिले.

Seminar || परिसंवाद संपुर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

परिसंवादाचे अध्यक्ष श्री. बनसोड यांनी देखील आपले विचार थोडक्यात मांडले आणि अध्यक्षीय विचार मांडून कार्यक्रमाचा समारोप केला. आपले विचार व्यक्त करताना बनसोड म्हणाले की, हे दीड वर्ष म्हणजे अत्यंत कठीण काळ गेला हा pandemic काळ होता, आणि प्रत्येक माणूस हा फिजिकली दूर होता. शाळा बंद होत्या, कॉलेजेस बंद होते परंतु डिजिटल माध्यमातून थोड्याफार प्रमाणात शिक्षण सुरू राहिले! हा डिजिटलचा एक फायदाच होय. हे माध्यम सर्वांना उपयुक्त आहे, कलावंतांना, साहित्यकाराना… pandemic च्या काळात सिनेमागृहे… नाट्यगृहे बंद होती… परंतु आता काळानुरुप नाट्यमहोत्सव देखील डिजिटलच्या माध्यमातून होत आहेत आणि डिजिटल माध्यम हे जगण्याचा अविभाज्य असा भाग बनलेले आहे. अशा रीतीने 1 मे रोजी एक सुंदर परिसंवाद डिजिटल माध्यमातूनच ऐकावयास मिळाला खूप खूप धन्यवाद मराठी साहित्य वार्ताचे.

संपुर्ण साहित्य संमेलन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Seminar || परिसंवाद

सौ. वर्षा दौंड, मुंबई
संपर्क – ९७५७४३०६८५

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close