लोकसंवाद

Women’s freedom|| उडान… – सौ. वर्षा दौंड

(Sanskardhan संस्कारधन साप्ताहिक सदर) - सौ. वर्षा दौंड

उडान… (Women’s freedom) – सौ. वर्षा दौंड

Women’s freedom || स्त्रीया अनेक स्वभावाच्या असतात. स्त्रिया शांत, तापट, सालस, मुखदुर्बळ, फटकळ, हजरजबाबी, विनोदी, समंजस, भांडकुदळ, विनम्र, साहसी, बेपर्वा, हसऱ्या, मनमिळावू, काटकसरी, वेंधळ्या, सोशिक, कर्तव्यदक्ष कठोर, प्रेमळ, अहंकारी, हुशार, मठ्ठ, शूर, बलशाली ही असू शकतात, असतात.

Women's freedom|| उडान... - सौ. वर्षा दौंड फोटो सौजन्य unsplash
Women’s freedom|| उडान… – सौ. वर्षा दौंड फोटो सौजन्य unsplash

(Women’s freedom) सौ. वर्षा दौंड यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ओह! हे तर मी फक्त स्वभाव विशेषच सांगितले, खरेतर या सर्व विशेषणांचे मिश्रण असते स्त्री! आजही शक्तीचे प्रतीक असलेली स्त्री स्वतंत्र आहे, असे आपण म्हणतो. हजार, पाचशे वर्षांपूर्वी ती स्वतंत्र नव्हती. बालपणीच तिचा विवाह केला जात असे. ती घराबाहेर पडू शकत नसे. तो एक वेगळा अभ्यास आहे. बाल विवाह होऊन त्यां आयुष्यात, कधीकधी अकाली वैधव्य आल्यामुळे, दुःखी, असमाधानी, तापट, द्वेषी, मत्सरी बनल्याची उदाहरणे आपण स्वामिनी, अहिल्या, स्वामी समर्थ सारख्या सिरीयल मधून बघतोच किंवा अनेक ऐतिहासिक कादंबऱ्य आपण वाचत आलेलो आहोत. त्यामुळे लोकहितवादी, राजा राम मोहन रॉय, आगरकर, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्त्री विषयक कार्य महत्त्वाचे वाटते.

(Women’s freedom) सौ. वर्षा दौंड यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आज आपण म्हणतो स्त्री स्वतंत्र आहे! (Women’s freedom ||) स्त्रीया शिकत आहेत. त्या नोकरीसाठी बाहेर पडतात. चांगले कपडे परिधान करतात. काही देश सोडल्यास, कोणी कोणते कपडे घालावे यावर बंधन नाही. कोणी स्त्रियांच्या कपड्यांवर कमेंट केली तर मोठा बवाल होऊ शकतो. यावर राजकारण पण होऊ शकते. पण मनाचा विचार केला तर, किती स्त्रिया स्वतंत्र आहेत? पुन्हा येथे विवाहित स्त्री, अविवाहित स्त्रीअसे दोन प्रकार गृहीत धरावे लागतील. माझ्या पाहण्यात या लग्न झालेल्या स्त्रिया कितीही वरच्या पदावर असो, ज्या त्यांच्या कामात कुठेही कमी पडत नाहीत, पण स्वतंत्र असतात का? मला प्रश्न पडतो. अपवाद आहेतही आणि असावेतच. एकूण स्त्रियांच्या 50% स्त्रिया स्वतंत्र आहेत असे आपण म्हणू शकतो का? त्या त्यांच्या मनाप्रमाणे वागू शकतात? पन्नास टक्के तर मला वाटतच नाही. चुकत असेल तर 70 टक्के म्हणते.

(Women’s freedom) सौ. वर्षा दौंड यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

135 कोटी जनता आपली! त्यात स्त्रियांचे प्रमाण हे जास्तच असते. हल्ली ते कमी झालेले आहे. अजूनही मी मुद्यावर येत नाहीये, पुन्हा संख्या हा माझा विषय नाही. मी विचार करतेय स्त्री मनाचा. तिच्या भावनांचा, तिच्या इच्छांचा… मग ती स्त्री कोणत्याही स्तरातील असो. ती झोपडपट्टीत राहणारी असो, मध्यमवर्गीय असो, भिक्षु वर्गातील असो, श्रीमंत, उच्च वर्गीय, खानदानी, उच्चविद्याविभूषित असो, ती खरोखर स्वतंत्र आहे का? मी स्वतः मुंबईसारख्या शहरात राहते. रस्त्यावर सतत वर्दळ असणारे शहर! लाखो स्त्रीया येथे नोकऱ्या करतात. घरकाम म्हणून भांडी घासण्याचे काम करणारी स्त्री देखील नोकरीच करत असते, पण मला वाटतं, अगदीच ती स्वतंत्र नसते.

(Women’s freedom) सौ. वर्षा दौंड यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तिच्या मनावर एक ओझे असते .तिच्या मानेवर एक टांगती तलवार असते, तिला वेळेचे बंधन पाळावे लागते, तिला कुटुंबाची काळजी करावी लागते, तिच्यावर संसाराची जबाबदारी असते. आणि ते तिने नाही केले तर, तिला समाजाची भीती असते. तिला अवहेलना, लोक दृष्टी, लज्जा, शरम याची सतत भीती बाळगावी लागते. तिच्या चुकांना क्षमा नसते. ती नवऱ्याच्या भयाखाली असते. घरीदारी दोन्हीकडे ही ती राबते पण तिला स्वतःची जाणीव सुद्धा नसते. स्त्रीचा मेंदू ही तीतकाच तल्लख असतो जितका की पुरुषांचा! पण तरीही बंधनात का? खच्चीकरण, कमी लेखणे ,पुरुषी अहंकार या भावना तिला मारून टाकतात. आपण स्त्री-पुरुष समानतेवर का येऊ शकत नाही? चुकून एखादी स्त्री वरचढ असेल तर स्त्रियाच स्त्रियांना नावे ठेवत असतात.

(Women’s freedom) सौ. वर्षा दौंड यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशिक्षितपणामुळे कितीतरी बुद्धिमत्ता वाया जात असते. संसारामध्ये कितीतरी स्त्रियांची कुचंबणा होत असते. स्त्री पुरुष समानता हे जीवन मूल्य फक्त अभ्यासा पुरतीच मर्यादित असल्यासारखे वाटते. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये शंभर टक्के स्त्रिया स्वतंत्र होऊ शकत नाहीत त्या राहतात आपली बुद्धी शुल्लक कारणांसाठी वापरत. कुणाच्यातरी ओझ्याखाली, दबावात. स्त्रिया कर्तबगारीने पुढे गेल्याची अनेक उदाहरणे आहेत! पण समाजातील अज्ञान ,गरिबी पुरुषांचे प्राधान्य स्त्रीशक्तीला दाबून टाकते. खेद वाटतो. संविधानात अंतर्भूत मूलभूत हक्क, राज्याची मूलभूत तत्त्वे यामध्ये स्त्रियांना हक्क व अधिकार याना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला गेलाय पण अज्ञानामुळे समाजाला याची जाणीवच नाही कधी हि स्वातंत्र्याची, मुक्तीची उडान पूर्ण होईल!

आणखी लेख वाचण्यासाठी मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टलला भेट द्या, आपले साहित्य पाठवा websahityawarta@gmail.com

सौ. वर्षा दौंड, मुंबई
संपर्क – ९७५७४३०६८५

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close