बातमीपत्र

World Authoress || आम्ही विश्व लेखिका आंतरराष्ट्रीय पातळीवर गुढी उभारेल ; प्रा. पद्मा हुशिंग

World Authoress || आम्ही विश्व लेखिका संस्थेची कार्यकारणी जाहिर

World Authoress || आम्ही विश्व लेखिका संस्थेची कार्यकारणी जाहिर

प्रतिनिधी:- सर्वांना सोबत घेवुन, समन्वय ठेवुन साहित्यिक वाटचाल तळमळीने करण्याचा संकल्प घेतलेल्या आम्ही विश्व लेखिका संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर गुढी उभारेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिका प्रा. पद्मा हुशिंग यांनी मराठी साहित्य वार्ताशी बोलतांना दिली आहे. आम्ही विश्व लेखिका संस्थेचा शुभारंभ दि. 13 एप्रिल 2021 रोजी आॅनलाईन पद्धतीने करण्यात आला. यावेळी संस्थेची कार्यकारणी घोषित करण्यात आली.

World Authoress || आम्ही विश्व लेखिका संस्थेची कार्यकारणी जाहिर
World Authoress || आम्ही विश्व लेखिका आंतरराष्ट्रीय पातळीवर गुढी उभारेल
World Authoress || आम्ही विश्व लेखिका आंतरराष्ट्रीय पातळीवर गुढी उभारेल

त्यामध्ये अध्यक्ष – प्रा. पद्मा हुशिंग, उपाध्यक्ष – प्रा. विजया मारोतकर, सचिव – वृषाली राजे, ठाणे, सहसचिव – मानसी जोशी, ठाणे, खजिनदार – संगीता चव्हाण ठाणे, सह खजिनदार – अस्मिता चौधरी ठाणे. कार्यकारिणी सदस्य – मंजिरी ताई कुलकर्णी, कराड, एडवोकेट सीमंतिनी नूलकर सातारा, अश्विनी निवर्गी उदगीर, माधुरी चौधरी औरंगाबाद, देविका ताई देशमुख अकोला, सूनेत्रा जोशी रत्नागिरी, विजया पंडितराव ठाणे आदींच्या नावाची घोषणा करण्यात आली.

World Authoress || आम्ही विश्व लेखिका संस्थेची कार्यकारणी जाहिर

ज्येष्ठ सदस्य व सल्लागार म्हणुन डॉ. विजयाताई वाड, माधवीताई घारपुरे, वासंती ताई वर्तक, प्रा. मेधाताई सोमण, शरयू शहा मुंबई, भारतीताई मेहता, नयना सहस्त्रबुद्धे आदींच्या नावाची घोषणा करण्यात आली.

World Authoress || आम्ही विश्व लेखिका संस्थेची कार्यकारणी जाहिर

याप्रसंगी मंदाकिनी क्षीरसागर बीड, बालिका बरगळ हिंगोली, शुभांगी दळवी सातारा, उर्मिला पांगम कोल्हापूर, अर्चना नळगीरकर उदगीर, (लातूर), कविता पुदाले उस्मानाबाद, मंगल ताई नागरे वाशिम, निशा डांगे यवतमाळ, नीता ताई बोबडे बुलढाणा, जयश्री कोटगीरवार वर्धा, ज्योतीताई पुजारी नागपूर, डॉ. वसुधा पांडे नागपूर, मीना खोंड नागपूर, स्वाती सुरंगळीकर नागपूर, डॉ. अंजली टाकळीकर नागपूर, भारतीताई भोरे वाशिम, कविताताई कठाणे भंडारा, डॉ सुनंदा जुलमे नागपूर याशिवाय अनेक लेखिकांनी स्वतःच्या भावना व्यक्त करत संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

World Authoress || आम्ही विश्व लेखिका संस्थेची कार्यकारणी जाहिर

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अश्विनी निवर्गी, उदगीर यांनी केले. जास्तीत जास्त लेखिकांनी या संस्थेने चालवलेल्या साहित्यिक चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पोर्टल वरील सर्व साहित्याचे हक्क संचालक यांचेकडे असुन पूर्वपरवानगी शिवाय कॉपी करू नये.
Close